आळेफाटा येथील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर दैदिप्यमान यश

1 min read

आळेफाटा दि.२५:- येथील ओम चैतन्य फाउंडेशन संचलित श्री जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 14 व्या नॅशनल अबॅकस स्पर्धा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचा मान उंचावला आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध गटांत उत्कृष्ट कामगिरी करत मानाची पारितोषिके पटकावली. Champion of Champions या सर्वोच्च गटात संजीत मधुकर सूर्यवंशी व नीलम नितीन शिंदे यांनी यश संपादन केले. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जाहिद शब्बीर पटेल,निकिता नितीन शिंदे, पौर्णिमा नारायण चितळकर, शर्वरी मच्छिंद्र खेमनर व श्रावणी संतोष सोनवणे, सिद्धी बाबुराव गोडे यांचा समावेश आहे. द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यांमध्ये आदिती लाहानू खेमनर, अक्षर उमेश भुजबळ, आयुष वसंत वाणी, पल्लवी अशोक शिंदे, सोनल पोपट खेमनर व स्वरा महेंद्र वाघुले यांनी यश मिळवले.तृतीय क्रमांक पंकज तानाजी सुळ यांनी मिळवला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तसेच पालकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रदिप गुंजाळ, सेक्रेटरी डॉ. अनुजा गुंजाळ, जयहिंद कॉलेज ऑफ नर्सिंगचे सीईओ ऋषिकेश खर्डे, उपप्राचार्य विठ्ठल म्हस्के यांनी संस्थेतर्फे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या लौकिकात भर पडली असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!