श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमध्ये नामांकित कंपनीमध्ये निवड

1 min read

माळवाडी बोटा दि.२५:– संगमनेर तालुक्यातील माळवाडी बोटा येथील Shri Swami Samarth Institute of Pharmacy या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. Genome Biotics या नामांकित कंपनीमध्ये आयोजित मुलाखत प्रक्रियेत आर्यन मोरे, निखिल निघोट, रोहन गपट, रुत्विक हांडे, शिवम राऊत, केतन बिबवे आणि साहिल वामन एकूण ७ विद्यार्थ्यांची प्रोडक्शन ऑफिसर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असून, या यशामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असलेल्या कटिबद्धतेची प्रचिती येते.या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. शिवाजी पोखरकर, सचिव डॉ. अमित पोखरकर, प्राचार्य डॉ. सांगळे, तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर वाकचौरे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!