अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी ४० लाख रुपये लाच; एसीबीची वसई तहसील कार्यालयात मोठी कारवाई

1 min read

वसई दि.२५:- अपर तहसीलदार (अकृषिक) वसई यांच्या कार्यालयात बाह्य कर्मचारी म्हणून कार्यरत असलेली खाजगी व्यक्ती अनिल प्रभाकर चौबल याने, तक्रारदाराच्या मौजे देपिवली (ता. वसई, जि. पालघर) येथील जमिनीवर केलेले अनधिकृत बांधकाम शासनामार्फत पाडण्यापासून रोखण्यासाठी, विनोद धोत्रे (अपर तहसीलदार,अकृषिक,वसई) यांच्यासाठी आणि स्वतःसाठी ₹ ७,००,०००/-(सात लाख रुपये) लाचेची मागणी केली.तसेच, सदर जमीन अकृषिक (NA) घोषित करण्यासाठी कागदपत्रांच्या तपासणीनंतर अतिरिक्त ₹ ४०,००,०००/- (चाळीस लाख रुपये) लाचेची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार दिनांक २१/०४/२०२६ रोजी सापळा कारवाई दरम्यान,तक्रारदाराच्या जमिनीवरील बांधकाम न पाडण्यासाठी मागितलेली ₹ ७,००,०००/- लाचेची रक्कम स्वीकारताना खाजगी व्यक्ती अनिल प्रभाकर चौबल याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), ठाणे यांनी दुपारी १३:१३ वाजता ताब्यात घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!