कामगारांच्या जेवणात आढळली पाल; ३० मजुरांना विषबाधा

1 min read

बेल्हे दि.२४:- मंगरूळ (ता.जुन्नर) येथे शेतात कांदा काढण्यासाठी आलेल्या मजुरांच्या जेवणामध्ये पाल आढळल्याने विषबाधा झाल्यामुळे त्यांना बेल्हे (ता.जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ दाखल करण्यात आले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगरूळ (ता. जुन्नर) येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाशिम जिल्ह्यातील मजूर ३० मजूर कांदा काढण्यासाठी आले होते.त्यांच्यासाठी मालकाने सकाळचे जेवण बनवले होते. या वेळी जेवण झाल्यावर भाजीमध्ये पाल आढळून आली. काही वेळाने मजुरांना उलटी, जुलाब, मळमळ चा त्रास होऊ लागला. सर्व मजुरांना बेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तात्काळ दाखल करण्यात आले. बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीमने तात्काळ उपचार सुरू केले. काहींना गोळ्या औषधे दिली. त्यापैकी २० मजुरांना सलाईन लाऊन इतर तपासण्या करून दिवसभर उपचार केले. सायंकाळी सर्व मजूर व्यवस्थित असल्याने सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. अशी माहिती बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फड यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!