ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट परीक्षेत विशाल जुन्नरच्या विद्यार्थांची बाजी
1 min read
आळे दि.२४:- VIPER, आळे येथील विद्यार्थ्यांचे GPAT परीक्षेत घवघवीत यश विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (VIPER), आळे येथील विद्यार्थ्यांनी फार्मसी क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची मानली जाणारी ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट (GPAT) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ही परीक्षा फार्मसी विषयातील ज्ञान, संकल्पना आणि स्पर्धात्मक क्षमतेचे महत्त्वपूर्ण मोजमाप (indicator) मानली जाते. चालू वर्षात महाविद्यालयातील एकूण १० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण करून परिसरातील सर्वोत्तम निकालाची नोंद केली आहे.
या यशामध्ये विवेक यादव यांनी अखिल भारतीय स्तरावर ६९१ वा क्रमांक मिळवून विशेष कामगिरी केली आहे. तसेच सानिका गोर्डे यांनी ९५२ वा, आदिल मोमीन यांनी २०४२ वा, प्रज्ञा गायकवाड यांनी २६६५ वा, धनश्री जोरी यांनी ३०४५ वा, श्रुती आवटी यांनी ३२४६ वा, चैताली गोरड यांनी ३९२९ वा, सिद्धी बोऱ्हाडे यांनी ३९७२ वा,
वैष्णवी जाधव यांनी ४३७० वा आणि प्राजक्ता भंडाळकर यांनी ४४१२ वा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, संस्थेचे CEO डॉ. डी. डी. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. एल. जाधव, तसेच GPAT समन्वयक प्रा. रवी गवारे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीला आणि प्राध्यापकांच्या योग्य मार्गदर्शनाला या यशाचे श्रेय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती, सातत्यपूर्ण सराव आणि सक्षम मार्गदर्शना मुळे विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले असून,
या यशामुळे संस्थेचा नावलौकिक आणखी वृद्धिंगत झाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षकवर्ग आणि संस्थेच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
