बेल्हा येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने विराट हिंदु संमेलन संपन्न
1 min read
बेल्हे दि.२३:- बेल्हे (ता.जुन्नर) येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने विराट हिंदु संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये सायंकाळी श्री भैरवनाथ मंदिरापासून भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु संस्कृतीचे संरक्षण आणि सामर्थ्यशाली भारताची निर्मिती, तसेच समरस व संघटित समाज घडविण्यासाठी
हिंदु शक्तीचे एकत्रीकरण करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळेस टाळ मृदुंगाच्या गजरात संतांच्या अभंगवाणी वारकरी मुले सहभागी झाले होते. विविध प्रकारांचे सादरीकरण केले. श्रीराम, सिता- लक्ष्मण, शिवाजी महाराज व मावळे यांची वेषभुषा केलेली मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
काही लहान मुलांनी वेगवेगळ्या विविध प्रकारच्या वेषभुषा धारण केल्या होत्या.या शोभायात्रेत परिसरातील हिंदु बांधव मोठ्या संखेने हजर होते.महिलांचा सहभाग लक्षणीय होता. त्या नंतर हर्षु ठाकुर,ह.भ.प.अनिल देवळेकर,अभिजीत शिंदे यांनी मार्गदर्शन केले. हर्षु ठाकुर यांनी केलेले भाषण अत्यंत प्रभावी होते. त्यानंतर अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला.
