आळ्यात होणार ‘जय मल्हार’ मंगल कार्यालय व प्रशस्त लॉन्स; मान्यवरांच्या हस्ते भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न
1 min read
आळे दि.२३:- आळे (ता.जुन्नर) येथे जय मल्हार मंगल कार्यालय व प्रशस्त लॉन्स या नूतन वास्तूचा भव्य भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.1 ऑक्टोबर 2026 पासून आपल्या सर्वांच्या मंगल कार्यासाठी हे मंगल कार्यालय खुले होणार आहे.
येथे वधू वरासाठी स्वतंत्र रूम व्यवस्था, वधु वर व वऱ्हाडीं साठी निवासी व्यवस्था, स्वतंत्र स्वच्छ भोजन कक्ष, निसर्गरम्य परिसर, स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पार्किंगसाठी प्रशस्त जागा, पिण्याचे शुद्ध फिल्टर पाणी, कॉन्फरन्स हॉल, बर्थडे पार्टी व इतर समारंभासाठी प्रशस्त जागा असून सर्व सुख सोयी युक्त हॉल असेल.
हा हॉल अल्प दरात उपलब्ध असणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान गणेश शिंदे भावकी व खंडोबा देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आला व उपस्थित सर्वांचे आभार मानण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी या नूतन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.
