निमगाव सावात बेकायदेशीररित्या दोन गावठी कट्टे तसेच जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
1 min read
नारायणगाव दि.२२:- पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर अग्नीशस्त्रे संबंधी कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल यांचे मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षीरसागर पो.नि. स्था.गु. शा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना
स.पो.नि. महादेव शेलार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की नारायणगाव पो.स्टे.हद्दीतील कारफाटा, निमगावसावा (ता.जुन्नर) येथे इसम नामे राहुल सुरेश साळवे रा.साकोरी तर्फे बेल्हे ता. जुन्नर हा त्याच्या दोन साथीदारांसह त्याच्या ताब्यातील MH 06 BE 4626 इर्टिगा गाडी घेऊन येणार आहे व त्याच्याकडे दोन गावठी कट्टे (पिस्टल) आहेत.
मिळालेल्या बातमी नुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचा समक्ष सदर ठिकाणी सापळा लाऊन १) राहुल साळवे रा. साकोरी ता. जुन्नर तसेच त्याचे दोन साथीदार नामे २) दर्पण सुरेश पवार वय २२ रा. नारायणगाव, ता.जुन्नर ३) तेजस संदीप मातेले वय २१ रा. नारायणगाव, ता. जुन्नर यांना ताब्यात घेऊन
त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता राहुल साळवे तसेच तेजस मातेले यांच्या कमरेला खोसलेले दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतूसे मिळून आली. त्यांच्या ताब्यातून सदर गावठी कट्टे, वाहन असा एकूण ५ लाख ७२००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत नारायणगाव पोस्टे येथे गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही साठी नारायणगाव पोस्टे च्या ताब्यात दिले आहे. सदरची कार्यवाही ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,स.पो. नि. महादेव शेलार,स.पो.नि. प्रवीण सपांगे,स.फौ. दिपक साबळे,पो.हवा संदीप वारे,पो.हवा अक्षय नवले यांनी केली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहे.
