अन्न आणि औषध प्रशासनाचा आदेश…पनीर आवडीने खातात? तर, ही बातमी नक्कीच वाचा
1 min read
मुंबई दि.२२:- हल्ली कोणत्या गोष्टी काय भेसळ असेल हे ओळखणे पार कठीण झाले आहे. खास करून खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकारने हॉटेल, रेस्टारंट, फास्ट फुड विक्रेत्यांना पनीरचे पदार्थ विकत असताना आता स्पष्टपणे दुधापासून तयार झालेले पनीर असा उल्लेख मेनू कार्डवर करावा लागणार आहे.
जर एखादा हॉटेलचालक चीज अॅनालॉग (Cheese analogue) पनीर विकत असेल तर तसा उल्लेख मेनू कार्डवर करावा लागणार आहे,असा आदेश राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे.भारत हा दुग्ध उत्पादनात अग्रगण्य देश असून पनीर हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे.
पनीर केवळ चविष्टच नाही तर पोषणामूल्यांनी समृध्द असल्यामुळे त्याचे आहारात विशेष स्थान आहे. पनीरमध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजे मोठया प्रमाणात आढळतात. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो.
पनीर व चिज अॅनालॉग मधील फरक : अन्न सुरक्षा आणि मानके (अन्नपदार्थ मानके व अन्न मिश्रित पदार्थ) विनियम, २०११ मधील विनियम २.१.१ नुसार “पनीर” हा केवळ दुधापासून बनविलेला पदार्थ आहे.याउलट “डेअरी अॅनालॉग” हा दूध व्यतिरिक्त इतर खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर आणि इतर घटक वापरून
बनविलेला पदार्थ असून तो पनीरसारखा दिसतो पण”पनीर” नाही. FSSAI च्या मानकांनुसार हा “चिज अॅनालॉग” या प्रवर्गात मोडतो.काही रेस्टॉरंट/केटरर्स/हॉटेल्स/फास्ट फूड विक्रेते हे अन्न पदार्थ तयार करताना चीज अॅनालॉगचा वापर मोठया प्रमाणात करण्यात येत असून त्याबाबत सदर आस्थापनांकडून ग्राहकांना पुरेशी माहिती उपलब्ध करून
देण्यात येत नसल्याकारणाने ग्राहकांची दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजारात काही ठिकाणी “पनीर अॅनालॉग” / “चीज अॅनालॉग” हे पदार्थ “पनीर” किंवा “चीज” या नावाने किंवा त्यासारख्या नावाने विकले जात आहेत. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम १८ (२) (e) नुसार उपभोक्त्यांना ते जे अन्न खातात त्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी अन्न पदार्थातील घटकपदार्थविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच अन्न सुरक्षा मानके (Labelling and Display Regulation) २०२०
मधील chapter ३ मधील नियमन ९ (६) नुसार अन्न व्यवसायीकाने अन्न पदार्थाची ग्राहकांना विक्री करताना, पोषण संबंधित माहिती आणि किंवा/त्यातील घटकांची माहिती, तसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
