स्कूटीच्या डिक्कीतून चार लाख लंपास; सीसीटीव्हीत चोरटे कैद

1 min read

आळेफाटा दि.२२:- दत्तात्रय तुकाराम वाघमारे (रा. वडगाव आनंद, ता. जुन्नर) यांनी आळेफाटा येथील सेंट्रल बँकेतून ४ लाख रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी आपल्या स्कुटीच्या डिक्कीत ठेवली आणि काही कामासाठी जवळच असलेल्या गोमाता पतसंस्थेत गेले. वाघमारे आत जाताच, पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी काही मिनिटांतच डिक्की तोडून रोकड लंपास केली. बाहेर आल्यावर डिक्की तुटलेली आणि पैसे गायब असल्याचे पाहून वाघमारे यांना मोठा धक्का बसला. आळेफाटा येथे मंगळवारी (दि.२१) सकाळी अकराच्या सुमारास चोरट्यांनी स्कुटीची डिक्की फोडून ४ लाख रुपये लंपास केले. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेने बँक परिसरात मोठ्या रकमा नेणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!