ऐतिहासिक ग्रामप्रवेशद्वार लोकार्पण व दानशूर मारुती लेंडे यांच्या ६५ व्या स्मृतिदिनानिमित्त भव्य सोहळा पिंपळवंडीत

1 min read

पिंपळवंडी दि.२१:- पिंपळवंडी (ता.जुन्नर) येथे ग्रामस्थांसाठी अभिमानाची व ऐतिहासिक अशी घटना घडणार असून,दानशूर श्रीमंत मारुती आबाजी पा.लेंडे यांच्या ६५ व्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामप्रवेशद्वाराचे भव्य लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक २२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवजन्मभूमी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद लेंडे (मा. उपाध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे) असणार आहेत. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार व शिवव्याख्याते अमोलजी मिटकरी (विधान परिषद सदस्य) उपस्थित राहणार असून, शिवनेर भूषण ह.भ.प. राजाराम महाराज जाधव यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे. दानशूर मारुती लेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार शरद सोनवणे यांच्या संकल्पनेतून इयत्ता पाचवी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३०० स्कूल बॅगचा भव्य लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे. तसेच पिंपळवंडी व काळवाडी ग्रामस्थांसाठी ६५ वस्तूंचा आकर्षक लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला असून, यात एलईडी टीव्ही, शिवण मशीन, वॉटर फिल्टर, गॅस शेगडी, मिक्सर, टेबल फॅन, डिनर सेट, पाण्याचे जार, इस्त्री, भिंतीवरील घड्याळ आदी उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे.कार्यक्रमाचे ठिकाण मळगंगामाता ग्रामप्रवेशद्वार, बाजार चौक, पिंपळवंडी येथे असून, सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता शेठबाबांची पालखी मिरवणूक, सायंकाळी ५ वाजता ऐतिहासिक प्रवेशद्वाराचे लोकार्पण, तर सायंकाळी ५.३० वाजता स्मृतिदिन सोहळा पार पडणार आहे.या वेळी शेठबाबांच्या प्रतिमेचे पूजन, कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मान्यवरांचे सत्कार, प्रवेशद्वार देणगीदारांचा गौरव, सामाजिक कार्य पुरस्कार वितरण, शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप तसेच उपस्थित नागरिकांसाठी भव्य लकी ड्रॉ आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.पिंपळवंडी ग्रामस्थांसाठी हा सोहळा सामाजिक एकतेचे व विकासाचे प्रतीक ठरणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!