सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलचा १० वी चा १०० टक्के निकाल

1 min read

राजुरी दि.२१:- राजुरी (ता.जुन्नर) येथील सह्याद्री व्हॅली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच लागलेल्या सीबीएसई दहावीच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. शाळेचा या वर्षीचा निकाल हा १०० टक्के लागला असून एकूण ३६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यात श्रेयस विवेक पाडेकर,सान्वी विनोद काकडे, आकांक्षा संतोष शिंदे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक संपादित केला. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महारिया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील वाटचालीसाठी इंजिनियरिंग कॉलेजचे प्राचार्य पी. बालारामडू व शाळेचे मुख्याध्यापक सचिन डेरे यांनी शुभेच्या दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!