मळगंगा वारकरी शिक्षण संस्थाच्या माध्यमातून अनाथ बालकांसाठी मोफत बाल संस्कार शिबिर
1 min read
बेल्हे दि.१९:- गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथे मळगंगा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने बाल संस्कार शिबीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ५ मे पासून २० मे पर्यंत लहान तसेच तरुण मुलांना अतिशय सोप्या भाषेमध्ये मृदूंग वादन, तबला वादन, पखवाद, गायन, हार्मोनियम, ग्रंथ अभ्यास, प्रवचन, हरिपाठ, हनुमान चालीसा, सहस्रनाम,
गीतापठण, कीर्तनसेवा अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संस्थेत प्रवेश घेणाऱ्या अनाथ बालकांसाठी सगळ्या सुविधा मोफत देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गुंजाळ यांनी दिली.विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात येणार असून
विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टरचे स्वच्छ पाणी तसेच आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. एक वेळ नाश्ता व दोन वेळेस रुचकर भोजणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थी तसेच पालकांनी ह.भ.प. कीर्तनकार जयसिंग महाराज माळवदकर – 9763625521, ह.भ.प. काशिनाथ बुवा गुंजाळ – 9096540553, ह.भ.प. गौरव महाराज करडीले –
9503963351, ह.भ.प. दिगंबर महाराज गुंजाळ – 9822915072, ह.भ.प. जालिंदर महाराज गुंजाळ – 7758092801, ह.भ.प. दिनेश महाराज भागवत – 8600181043 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन गुळुंचवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
