महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी कल्पना काळे यांची निवड

1 min read

Oplus_16908288

बेल्हे दि.१८:- पुणे जिल्हा परिषदेच्या बोरी – खोडद गटाच्या लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्या कल्पना वैभव काळे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बोरी – खोडद जिल्हा परिषद गटातील आणि महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण यांस जुन्नर तालुक्यातील महिलांच्या शाळकरी मुलीच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या निवडीबद्दल जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, बोरी गणाचे पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी जिल्हा परिषदेत गटातील कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!