जिल्हा परिषदेच्या शिक्षण व क्रीडा समितीवर स्मिता कणसे यांची निवड
1 min read
Oplus_16908288
बेल्हे दि.१८:- पुणे जिल्हा परिषदेच्या बेल्हे – राजुरी गटाच्या लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्या स्मिता पंकज कणसे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिक्षण व क्रीडा समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बेल्हे – राजुरी जिल्हा परिषद गटातील आणि जुन्नर तालुक्याच्या विविध शैक्षणिक समस्या मार्गी लावण्यासाठी मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे, पंचायत समिती सदस्य शांताराम दाते, राजेंद्र पिंगट यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, बेल्हे राजुरी जिल्हा परिषदेत गटातील कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे. स्मिता कणसे म्हणाले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील व बेल्हे राजुरी गटातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार शैक्षणिक सुविधा पोहोचवणार आहे. सर्व शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. असून जिल्हा परिषदेच्या शाळा मॉडेल करायच्या आहेत.

