मंथन परिक्षेत स्मार्ट व्हिलेज पारगावच्या जिल्हा परिषद शाळेचे केंद्रात वर्चस्व
1 min read
पारगाव दि.१९:- जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्मार्ट व्हिलेज पारगाव येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या मंथन परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून केंद्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
त्याबद्दल पारगाव मधील ग्रामस्थांनी मुलांना व सहभागी शिक्षकांचा सन्मान करून मुलांना बक्षीस म्हणून शालेय उपयोगी वस्तू भेट देऊन त्यांचा गुणगौरव केला.मंथन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी इयत्ता २ री शिवांश दिलीप झंजाड (१२४/१५०) केंद्रात ३ रा,

स्वयम विकास चव्हाण (२७६/३००) केंद्रात २ रा, अक्षरा सचिन डुकरे (२७२/३००) केंद्रात ३ रा, शर्वरी गजानन चव्हाण (२६८/३००) केंद्रात ४ था, आराध्या विनायक शिर्के (२६६/३००) केंद्रात ५ वा, यशराज संदीप विश्वे (२६६/३००) केंद्रात ५ वा, श्रेया रघुनाथत तटूटू (२६२/३००)
केंद्रात ६ वा, श्रावणी नारायण भालेराव (२५८/३००) केंद्रात ७ वा,श्लोक किरण तटूटू २५४/३००) केंद्रात ८ वा सहभागी शिक्षक मुख्याध्यापक लहू गोफने, कैलास खुटाळ, शारदा सोनवणे, तानाजी मुळे, प्रमिला खुटाळ, राजू आवटी,कविता आवटी, राजश्री साळवे या यशस्वी विद्यार्थ्यांचा व सहभागी शिक्षकांचा जुन्नर पंचायत समिती सदस्य गटनेते संभाजी चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यांनी गावातील विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी कैलास खुटाळ व शारदा सोनवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गावच्या सरपंच रेश्मा बोटकर, उपसरपंच रामचंद्र डुकरे, माजी तज्ञ संचालक विघ्नहर सहकारी साखर कारखाना किरण तट्टू, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रघुनाथ तट्टू,
उपाध्यक्ष हनुमंत भोर, तंटा मुक्ती अध्यक्षबाबाजी डुकरे, माजी उपसरपंच रामदास तट्टू, सुभाष चव्हाण, तुषार येवले, मनीषा जाधव, विकास चव्हाण, नवनाथ बोराडे, रामकृष्ण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
