मॉडर्नची हाडवळे रिया प्रथम; सलग ११ वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा कायम

1 min read

बेल्हे दि.१६:- मॉडर्न इंग्लिश स्कूल बेल्हे (ता.जुन्नर) इयत्ता १० वी सीबीएसई बोर्ड चा शैक्षणीक वर्ष २०२५-२६ चा निकाल १०० टक्के लागला असून सलग ११ वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा कायम राहिली असल्याची माहिती प्राचार्या विद्या गाडगे यांनी दिली.प्रथम क्रमांक हाडवळे रिया प्रवीण ९२.४० टक्के, द्वितीय भारती समर्थ दत्तात्रय (८९.४०), तृतीय क्रमांक चौरे नीरज जयराम (८७.२०) याने पटकावला आहे. उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे,सर्व संचालक मंडळ, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी.सिंग, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!