जुन्नर तालुक्यातील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अभिमानास्पद यश- GPAT व GATE 2026 मध्ये दमदार कामगिरी
1 min read
बेल्हे दि.१६:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे च्या अंतिम वर्ष बी.फार्म विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेचा नावलौकिक उंचावला आहे.
संस्थेच्या चार विद्यार्थ्यांनी GPAT (Graduate Pharmacy Aptitude Test) व GATE (Graduate Aptitude Test in Engineering) 2026 या परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. GPAT 2026 मध्ये कु. तांबोळी मेहर (स्कोअर: 220 | AIR: 1682), कु. सीमा घोडे (स्कोअर: 201 | AIR: 2867)
आणि कु. आरती वाघमारे (स्कोअर: 197 | AIR: 3223) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. तर GATE 2026 मध्ये कु. वैष्णवी लंघे (स्कोअर: 384 | AIR: 5190) हिने यश मिळवत संस्थेचा गौरव वाढवला.या विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, समर्पण आणि शिस्तबद्ध अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले असून,
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.या यशामागे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समितीचे प्रमुख प्रा. शुभम गडगे तसेच त्यांच्या सहकारी शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करता आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके तसेच कॅम्पस डायरेक्टर मा. राजीव सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके,
समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, बी. फार्मसी विभागप्रमुख डॉ. सचिन दातखिळे तसेच डी. फार्मसी विभागप्रमुख डॉ. शीतल गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,
विद्यार्थ्यांचे पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उल्लेखनीय यशामुळे समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीने पुन्हा एकदा शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा अधोरेखित केली असून, भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
