विशाल जुन्नर च्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव समारंभ
1 min read
बेल्हे दि.१६:- विशाल जुन्नर फार्मसी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये विशाल जुन्नर सेवा मंडळ, विशाल जुन्नर सहकारी पतपेढी व विशाल जुन्नर माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात नियुक्त झालेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी रविभाऊ बाबासाहेब लांडगे महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, अंजली अजय वाळुंज, नगरसेविका, महानगरपालिका नवी मुंबई, स्मिता पंकज कणसे, जिल्हा परिषद सदस्या, पुणे, प्रज्ञा पंकज राऊत, नगरसेविका, नगरपरिषद, जेजुरी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.लक्ष्मण कोरडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सदर प्रास्ताविकात आपल्या संस्थेला शैक्षणिक क्षेत्रात शहरीभागापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संधी भेटली तर नक्कीच संस्थेसाठी मोलाचे ठरेल अशी आशा व्यक्त केली.
विशाल जुन्नर सेवा मंडळ, विशाल जुन्नर सहकारी पतपेढी व विशाल जुन्नर फार्मसी माजी विद्यार्थी संघ या संस्थांच्या वतीने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे संस्थेचे माजी विद्यार्थी जे विविध पदांवर अतिशय जबाबदारीने कार्यरत आहेत त्यांचे सन्मान संपन्न झाले.
विशाल जुन्नर सेवा मंडळ माजी विद्यार्थी संघाकडून महाविद्यालयात सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेहमीच विविध उपक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांना सुकर अध्ययन व शिक्षकांना अध्यापन सुलभ होण्यासाठी माजी विद्यार्थी संघाकडून एक अद्ययावत डिजिटल इंटरॲक्टीव स्क्रीन महाविद्यालयास भेट दिली.
विशाल जुन्नर पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण पारखे यांनी नवनिर्वाचित माजी विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्मिता कणसे यांनी महाविद्यालयातील शिस्त त्यांच्या जडणघडणीत किती महत्त्वाची ठरली यासाठी सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
महाविद्यालासाठी काही काम करण्याची संधी मिळाली तर नक्कीच केल जाईल असा विश्वास त्यांनी दिला. अंजली नढे व प्रज्ञा राऊत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रविभाऊ लांडगे यांनी महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच्या काही गमती जमती सांगितल्या.
त्यांच्या जडणघडणीत महाविद्यालयातील शिस्त आणि ग्रामीण जीवन याचा मोलाचा वाटा आहे हे त्यांनी अधोरेखित केले. संस्थेसाठी व शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असा विश्वास त्यांनी दिला. महाविद्यालयासाठी खूप अभिमानाची गोष्ट म्हणजे सर्व प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असताना
आपल्या विद्यालयासाठी या सर्वांनी वेळ काढून आपल्या शैक्षणिक काळाला त्यांच्या मित्रांसोबत पुन्हा एकदा अनुभवलं व विशाल जुन्नर फार्मसी परिवाराच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. अतिशय उत्साही आणि आणि आनंददायी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व उत्कृष्ट निवेदक सौरभ भापकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपन्न झाला. या आयोजित कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळ चे अध्यक्ष अंकुश सोनवणे, उपाध्यक्ष दिनेश पाडेकर, सचिव विजय पारखे, सहसचिव संपत काने,
खजिनदार शिवाजी बांगर, विश्वस्त लक्ष्मण कोरडे, दिलीप चासकर, चंद्रकांत सोनवणे, विक्रांत काळे, वसंत पाडेकर, महेंद्र शिंदे, सचिन हाडवळे, सचिव संतोष पारखे, विशाल जुन्नर पतपेढीचे अध्यक्ष अरुण पारखे, संचालक सुभाष वाबळे, शिवाजी कोकणे व मेटांगळे, विशाल जुन्नर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष भरत शेळके,
विशाल जुन्नर सेवा मंडळ चे माजी अध्यक्ष नंदकुमार पाडेकर, विशाल जुन्नर प्रतिष्ठान चे अध्यक्ष अशोक सोनवणे, ॲड. सोपान डुंबरे, विशाल जुन्नर पतपेढीचे माजी प्रशासकीय अधिकारी महादू मेटांगळे, ॲड. संजय टेंभे,
विशाल जुन्नर सेवा मंडळ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ दुष्यंत गायकवाड,
प्राचार्य डॉ सुरेश जाधव, प्राचार्या डॉ. रूपाली हांडे, विशाल जुन्नर फार्मसी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. राकेश वाघ, उपाध्यक्ष विजय साळवे, सचिव प्रा. आश्लेषा चिंचवडे, खजिनदार प्रा. अश्विनी कवडे, विश्वस्त दीपक सोनवणे, प्रवीण शेळके, संकेत नवले,
पूनम चिंचवडे व संस्थांचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांसाठी अतिशय रुचकर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी संघ व सर्व विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.
