श्री जे. आर. गुंजाळ स्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गौरव

1 min read

आळेफाटा दि.१५:- श्री जे. आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आळेफाटा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी ओम चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप गुंजाळ, सेक्रेटरी डॉ. अनुजा गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य विठ्ठल म्हस्के यांचीही उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भाषण, कविता व इतर सांस्कृतिक उपक्रमांद्वारे जयंती उत्साहात साजरी केली. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्धता व उत्साह दिसून आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!