मंथन स्पर्धा परीक्षेत दत्तनगर शाळेचा राज्यात डंका; राज्यात ८ वा जिल्ह्यात ३ रा क्रमांक

1 min read

बेल्हे दि १५:- बेल्हे येथील दत्तनगर (ता. जुन्नर) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळाच्या विद्यार्थ्यांनी मंथन स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल व शाळेचे नाव लौकिक केल्यामुळे ग्रामस्थांनी बुधवार दि.१५ रोजी या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा सन्मान केला. दत्तनगर येथील इयत्ता २ री चा श्रीराज सुभाष गुंजाळ १५० पैकी १३६ गुण मिळून याचा महाराष्ट्र राज्यात आठवा तर पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक आला आहे. तर २ री तील देवांश सुहास गुंजाळ याचा १५० पैकी १३४ गुण मिळून महाराष्ट्र राज्याचे नववा व पुणे जिल्ह्यात चौथा क्रमांक आला आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थांनी दोघांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शाळेचे शिक्षक संतोष रोकडे, देवीदास पिंगट, राहुल गुंजाळ पाटील, संजय मटाले,पूजा डुंबरे, सीमा गुंजाळ, साधना पिंगट, जितेंद्र गुंजाळ यांसह विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!