शिक्षण, समता आणि संघर्ष हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनमंत्र:- पांडुरंग पवार

1 min read

निमगाव सावा दि १४:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निमगाव सावा येथे उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना संस्थापक पांडुरंग पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन, विचार व कार्याचा सविस्तर आढावा घेतला.त्यांनी सांगितले की, डॉ.आंबेडकर यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देत “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र दिला. सामाजिक समता, बंधुता आणि न्याय यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी सर्व समाजघटकांना समान हक्क मिळवून दिले.तसेच त्यांनी अस्पृश्यता, अन्याय आणि विषमता याविरुद्ध लढा देत समाजाला प्रगतिचा मार्ग दाखवला.पुढे बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकरांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद शिंदे, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!