सावधान! रेडी आमरस खाताय? भेसळयुक्त मँगो पल्प जप्त; खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

1 min read

राजगुरुनगर दि.१३:-खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील अविष्कार एंटरप्रायझेस (मूळ पुरवठादार) व मावळ तालुक्यात उरसे येथील महंमद एकरामुल उर्फ अक्रम गुलाम यांच्याकडे मँगो पल्प व मँगो पल्प तयार करण्यासाठी भेसळयुक्त साखर, गाईचे दुध, केमिकलयुक्त केशर कलर असे तब्बल अडीच लाख किमतीचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून जप्त केला.सध्या खेडेगावात मँगो पल्पचा आंबारस वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शंभर रुपयात एक किलो मँगो पल्प मिळत असल्याने लोकांना मँगो पल्प आमरस वापरण्याची भुरळ पडली आहे. परंतु हा मँगो पल्प शंभर टक्के भेसळयुक्त व केमिकल वापरून बनवला जात असल्याचे आता उघड होत आहे.भेसळयुक्त पल्पमुळे जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा होण्याचा मोठा धोका असतो. रंगाचा अतिवापर आणि हानिकारक रसायनांच्या वापरामुळे दीर्घकाळात कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत तब्बल तीन हजार २८२ किलो भेसळ व केमिकलयुक्त मँगो पल्प नष्ट करण्यात आला. या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्त ना. रा. सरकटे, दक्षता विभागाचे अधिकारी वा. औ. शिंदे, स्वा. दा. मस्के, प्र. शि. कच्छवे यांनी सहभाग घेतला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!