कावळ पिंपरीत बिबट्या जेरबंद; महिन्यात दोन बिबटे पिंजऱ्यात

1 min read

बेल्हे दि.१२:- कावळ पिंपरी (ता.जुन्नर) येथे पाबळे मळ्यातील बाळू नामदेव पाबळे यांच्या गट नंबर २०५ मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात चार वर्षाचा मादी बिबट जेरबंद झाला आहे. रविवार दि.१२ रोजी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला आहे. सदर बिबट्याची रवानगी माणिक डोह येथील बिबट निवारा केंद्रात केली आहे. अशी माहिती बेल्हे वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली. या बिबट्याने गेल्या महिन्याभरापासून धुमाकूळ घातला होता. अनेक पाळी प्राण्यांवरती बिबट्याने हल्ले केले होते.हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. वाढत्या बिबट्यांमुळे परिसरात नागरिक व शालेय विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीच वातावरण पसरला आहे. त्यामुळे या परिसरात पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी गणेश पाबळे, कृष्णा शिरतर, संदीप जाधव यांनी केली आहे. या गावात गेल्या महिन्याभरात बिबट्या जेरबंद होण्याची ही दुसरी घटना आहे. या आधी कृष्णा शिरतर यांच्या गट नंबर १४२ (१) या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवार दि.१३ मार्च रोजी बिबट्या जेरबंद झाला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!