नगदवाडी केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप
1 min read
नगदवाडी दि.१२:- नगदवाडी (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे यांच्या पुढाकाराने शाळा व्यवस्थापन समिती व शाळा सल्लागार समितीच्या वतीने शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व १८० विद्यार्थ्यांना
दर्जेदार व टिकाऊ अशा शालोपयोगी शैक्षणिक रायटिंग पॅडचे वाटप करण्यात आले अशी माहिती मुख्याध्यापिका उज्ज्वला बोऱ्हाडे यांनी दिली.या उपक्रमासाठी सर्व सदस्यांनी आर्थिक योगदान दिले.कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे,शाळा सल्लागार समिती अध्यक्ष सुरेश बढे,सदस्य संगीता बढे,रघुनाथ बढे, दयानंद बढे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन केंद्रशाळेतील शिक्षक मंगेश मेहेर, पंडित चौगुले,निलेश शेलार,विद्या वाघ,सुप्रिया अभंग,आशा आरेकर व उज्वला कांबळे यांनी केले.सामाजिक व शैक्षणिक उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो
व विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होते असे मत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश बढे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेहेर यांनी केले तर आभार निलेश शेलार यांनी मानले.
