सीईटी परीक्षा केंद्र म्हणून श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट माळवाडी ची निवड
1 min read
बोटा दि.१२:- महाराष्ट्र राज्यातील सीईटी परीक्षांसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील माळवाडी (बोटा) येथील श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट यांची अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी सोय निर्माण झाली असून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेतली गेली आहे.
या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक संगणक सुविधा, सुरक्षित व शांत परीक्षा वातावरण तसेच आवश्यक तांत्रिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा पारदर्शक व सुरळीत पार पडावी यासाठी संस्थेने सर्व तयारी पूर्ण केली आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पोखरकर यांच्या विशेष प्रयत्नातून संस्थेमध्ये गुणवत्तापूर्ण
व आधुनिक शिक्षण सुविधा उभारण्यावर सातत्याने भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनविणे, डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले की,
“ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. सीईटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे.”तसेच सचिव डॉ. अमित पोखरकर यांनी शिक्षण क्षेत्रात नवोपक्रम,
तांत्रिक सुसज्जता आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रम राबवून संस्थेची प्रगती साधली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच करिअर मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षांची तयारी यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी शैक्षणिक धोरण सांगताना म्हटले की, “शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सुविधा,
तांत्रिक सुसज्जता आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टिकोन यावर आम्ही विशेष भर देत आहोत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सक्षमपणे उभारण्यात आली आहे.”संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून परीक्षा केंद्राची उत्कृष्ट तयारी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज व प्रशस्त बसण्याची व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता तसेच तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सर्व आवश्यक सोयी-सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मार्गदर्शन, बसण्याची योग्य व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परीक्षा यशस्वीरीत्या पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
