गौरी साळवे ची पुणे शहर पोलीस पदी निवड; एनटीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक

1 min read

साकोरी दि.११:- मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या गौरी बाळासाहेब साळवे (वय २०), रा.साकोरी (ता.जुन्नर) हिची पुणे शहर पोलीस दलात नियुक्ती झाली आहे.विशेष म्हणजे त्यांनी एनटीसी प्रवर्गातून पुणे शहरात प्रथम क्रमांक मिळवत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.गौरी बाळासाहेब साळवे या मूळ शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे वडील बाळासाहेब ज्ञानदेव साळवे हे शेती व्यवसाय करतात, तर आई अरुणा बाळासाहेब साळवे या गृहिणी आहेत. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या गौरी यांनी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे.गौरी यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींनाही प्रेरणा मिळत असून “इच्छाशक्ती आणि मेहनत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही” हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.यशाच्या प्रवासात त्यांनी आळेफाटा येथील भाग्यविधाता करिअर अकॅडमी येथे प्रवेश घेतला होता. येथील शिक्षकांनी तिला योग्य मार्गदर्शन करत स्पर्धा परीक्षेसाठी सक्षम बनवले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच गौरी यांना यशाचा मार्ग अधिक सुकर झाला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!