गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली जेजुरीला होणार बहुजन परिवार संवाद मेळावा
1 min read
जेजुरी दि.११:- महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाला सामाजिक आणि राजकीय स्तरावर एकत्र करण्यासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने बहुजन परिवार संवाद मेळावा 2026 चे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील बहुजन समाजाला आपल्या मागण्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ तयार करणे
हे या मेळाव्याचे प्रमुख कारण असून बहुजन समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी यापुढे महाराष्ट्रातील सर्व समाज घटक एकत्रित येऊन लढण्यासाठी या सर्वांना एकत्रित करणे आणि त्या माध्यमातून बहुजन समाजाचा आवाज अधिक सक्षम करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
आज महाराष्ट्र मध्ये इतर मागास आणि भटक्या विमुक्त प्रवर्गातील समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि आगतिक आहे. शासन स्तरावर योग्य प्रतिनिधित्व अभावी आज या समाजाची मुस्कटदाबी होण्याचा प्रकार समोर येत आहे. त्यामुळेच भटक्या विमुक्त प्रवर्गातील ज्येष्ठ नेत्यांना शासन स्तरावर योग्य ठिकाणी प्रतिनिधित्वाची संधी मिळावी
यासाठी तमाम बहुजन समाजाच्या वतीने जेजुरी येथे बहुजन हृदयसम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी मल्हार नाट्यगृह जेजुरी येथे बहुजन परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व समाज घटक सहभागी होणार असून
एकत्रित रित्या बहुजन समाजातील जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांना विधान परिषदेत संधी देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणी करण्यासंदर्भातला ठराव सर्व समाजाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या वतीने घेण्यात येणार आहे.
समारंभाचे अध्यक्ष आ.गोपीचंद पडळकर आमदार जत विधानसभा असतील तर स्वागताध्यक्ष मा. रोहित जी खोमणे नगरसेवक जेजुरी नगरपरिषद, निमंत्रक मा.अंकुश जाधव प्रदेशाध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना 1. या मेळाव्यामध्ये भटक्या विमुक्त प्रवर्गातील अनेक समाज आपापल्या वेशभूषेमध्ये सहभागी होणार असून
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून सर्व समाज घटकांचे प्रमुख नेते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. 2. तसेच हजारोंच्या संख्येने बहुजन समाज बांधव या मेळाव्यास उपस्थित राहतील3. या समारंभाचे स्वरूप सर्वप्रथम आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यापासून भटक्या विमुक्त प्रवर्गातील सर्व समाज बांधवांच्या समवेत रॅली ची सुरुवात होईल या रॅलीमध्ये सर्व समाज बांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होणार आहेत.
