आनंद मेळाव्यातून विद्यार्थ्यांची ५० हजारांची उलाढाल
1 min read
आणे दि.११:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये फन फेअर (आनंद यात्रा) चे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल व फनी गेम्स लावण्यात आले होते.विविध पदार्थ बनवण्यापासून ते विक्री पर्यन्त सर्व कामे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पार पाडली.
या मध्ये विक्री करून विद्यार्थ्यांनी ५० हजार रुपयांची उलाढाल केली. मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी तसेच दैनंदिन जीवनात भाज्या कापणे, एखादा पदार्थ बनवणे, बाजारातून वस्तू आणणे, त्याचा हिशोब ठेवणे,
खरेदी – विक्री करणे याचे प्रत्यक्ष शिक्षण देण्यासाठी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या यात्रेत पाणीपुरी, छोले-बटुरे, समोसा, वडापाव, मंचूरियन,पाणीपुरी, भेळ, लिंबू सरबत, टरबूज, मिठाई, दाबेली, सँडविच,मसाला पापड, कैरी पन्हं, भेळपुरी, जूस, भेळ, चायनिज भेळ,मटकी चॅट,फूड सॅलड, इडली, चणा चॅट अशा विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती.
या वेळी काही खाद्यपदार्थ विद्यार्थांनी घरून बनून आणले होते तर काही शिक्षकांच्या मदतीने शाळेत बनवण्यात आले. या बाल आनंद मेळाव्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे, सर्व संचालक मंडळाने केले.मेळाव्याचे उद्घाटन विश्वस्त दावला कणसे,
प्राचार्य विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी सिंग, पालक यांच्या हस्ते संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या उत्साहात आनंद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बेल्हे व परिसरातील नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
