केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन

1 min read

बीड दि.९:- केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज गुरुवार दि.९ सकाळी भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ हा अपघात घडला. राकेश गिड्डे हे स्वतःच्या खासगी कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाला हा भीषण अपघात झाला. एका तरुण आणि अत्यंत कार्यक्षम महसूल अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण बीड जिल्हा आणि विशेषतः केज तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे. महसूल प्रशासनातील एका महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याचा असा अचानक अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!