श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर च्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा सन्मान

1 min read

बेल्हे दि.९:- श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर बेल्हे येथे १९८८ च्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा विद्यालया तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी 1988 च्या बॅच चे माजी विद्यार्थी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी किसन शिंदे

यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित सदस्यांचा परिचय अजीम इनामदार यांनी करून दिला.1988 च्या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी व आवश्यक असलेल्या विविध गरजांसाठी केलेल्या मदतीचा सन्मान आणि माजी विद्यार्थी हे शाळेचे वैभव आणि आधारस्तंभ असतात हे विद्यार्थ्यांना कळावे आणि भविष्यात त्यांनीही शाळेसाठी आपले कर्तव्य पार पाडावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी 1988 च्या बॅच चे माजी विद्यार्थी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी वाकड

पोलिस स्टेशनचे PSI किसन शिंदे,1988 च्या बॅच चे कार्यवाहक जालिंदर औटी, खजिनदार रामदास डोंगरे, समन्वयक बाळासाहेब गुंजाळ आणि लाला अर्बन बँकेचे अधिकारी दत्तात्रेय बांगर उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी सरपंच विश्वनाथ डावखर यांनी शाळेचा विकास आणि होत असलेली प्रगती यावर प्रकाश टाकत सर्वांनी एकमताने या सरस्वती मंदिराची सेवा करावी आणि एक नामांकित विद्यालय उभे करावे असे मत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक पडवळ सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या विकासात आणि मूलभूत गरजा यात 1988 च्या बॅच ने केलेल्या कामाचा विशेष उल्लेख करत शालेय विद्यार्थ्यांनी भविष्यात अशा माजी विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या कार्याचा वारसा घेत भविष्यात शाळेच्या वैभवात भर घालावी असे विचार व्यक्त केले. 1988 च्या बॅच ने शाळेतील मुलांच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय व्हावी यासाठी RO प्लांट चे काम, उन्हाळ्यातील कडक तापमानात मुलांसाठी हवेशीर सोय व्हावी यासाठी संपूर्ण शाळेसाठी दिलेले सीलिंग फॅन्स, बदलत्या युगातील तंत्रज्ञान आणि इंडस्ट्री 4 या भविष्यात येणाऱ्या विकासाच्या मार्गाच्या दिशेने लागणारे मूलभूत ज्ञान मुलांना मिळावे यासाठी उभ्या राहत असलेल्या कृत्रिम बुद्धिमता,रोबोटिक्स तंत्रज्ञान कार्यशाळा यासाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यासाठी अर्थिक मदत आणि लॅब च्या हॉल मधील अद्ययावत पार्टीशन, दरवाजे यासाठी केलेली मदत यांचा यावेळी मुख्याध्यापक सरांनी आवर्जून उल्लेख केला. यावेळी सरांनी माजी विद्यार्थी हे शाळेचे वैभव असतात असे सांगताना किसन शिंदे यांनी आपल्या शाळेचे नाव निश्चितच सार्थक केले आहे असे मत व्यक्त केले. भविष्यात विद्यार्थ्यांनी किसन शिंदे यांचा आदर्श घेत आपल्या विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना किसन शिंदे यांनी विद्यालयातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. एक माजी विद्यार्थी जगाच्या पाठीवर कोठेही जावो आणि कितीही नावलौकिकस येवो पण तो आपल्या शाळेला कधीच विसरत नाही असे आपले मत व्यक्त करत ज्या शाळेने आपणास समाजात मान आणि सन्मान मिळवून दिला तिच्या सेवेसाठी आमची 1988 ची बॅच भविष्यात सदैव कार्यरत असेल आणि विद्यालयाच्या वैभवात आपली सेवा सदैव देत राहील असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित शिक्षक यांनी आपल्या शाळेत राबवत असलेल्या विविध अभ्यासक्रमांचे आणि विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना चालना देण्यासाठी करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. प्रास्ताविक अजीम इनामदार यांनी केले आणि भविष्यातील शाळेचे संकल्प आणि उपाययोजना यांची माहिती देत, सर्वांनी मिळून शाळेच्या वैभवात भर घालावी असे आवाहन करत उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य यांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पडवळ सर, सर्व शिक्षक वृंद, माजी सरपंच विश्वनाथ दादा डावखर, सामाजिक कार्यकर्ते नाना भुजबळ, बेल्हेकर, शालेय समितीचे सदस्य आणि बेल्हे गावचे नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!