जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील सराईत मोटारसायकल चोर अटकेत, स्थानिक गुन्हे शाखा व घोडेगाव पोस्ट ची कारवाई

1 min read

जुन्नर दि.९:- पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीमध्ये मंचर, घोडेगाव, नारायणगाव, ओतूर या परिसरातून मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. सदर मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या सूचना मान्य पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि महादेव शेलार, स.फौज.दीपक साबळे, पोहवा वारे, नवले सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना घटनास्थळा वरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून पुढील तपास सुरू केला. सदर सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता प्रत्येक ठिकाणी तोच चोरटा असल्याचे दिसून आले. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की सदर सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा इसम हा रेकॉर्डवरील मोटरसायकल चोर राहुल अशोक दाते राहणार मंचर हा आहे. तसेच त्याच्यावर यापूर्वी देखील बरेच गुन्हे दाखल आहेत. तरी तो आज त्याच्या ताब्यातील चोरीच्या मोटरसायकल ह्या घोडेगाव नारोडी फाटा येथे विक्रीसाठी येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदार मार्फत समजले त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच घोडेगाव पोलिस स्टेशन कडील पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून त्यास ताब्यात घेऊन त्याच त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल अशोक दाते वय २५ राहणार मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे असे सांगितले. त्याच्या ताब्यातून घोडेगाव, मंचर, नारायणगाव,ओतूर या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकल तसेच नारायणगाव येथून चोरीस गेलेला एक मोबाईल असा १,११,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत. १)घोडेगाव पोस्टे ६२/२०२६ भा.न्या.सं.३०३(२) २)मंचर पोस्टे ८६/२०२६ भा.न्या.सं.३०३(२) ३)नारायणगाव पोस्टे ७०/२०२६ भा.न्या .सं.३०३(२) ४)नारायणगाव पोस्टे ७२/२०२६ भा.न्या.सं. ३०३(२) ५)ओतूर पोस्टे ९५/२०२६ भा.न्या.सं.३०३(२) सदर आरोपीस पुढील तपास कामी घोडेगाव पोस्टे येथे जमा करण्यात आला असून पुढील तपास घोडेगाव पोलीस स्टेशन येथे सुरू आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर,सपोनि. महादेव शेलार, सपोनि. सागर पवार(घोडेगाव) सहा. फौज.दीपक साबळे,पोहवा. संदीप वारे,पोहवा. राजू मोमिन
पोशी. अक्षय नवले,घोडेगाव पो.स्टे.चे पोसई महेश पवार, पो.हवा. अमरदीप वंजारी विठ्ठल वाघ, नीलेश तळपे, सावंत, कांबळे,पो.कॉ. तनपुरे, लगड, वायदंडे. तसेच नारायणगाव पोस्टे चे मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, सोमनाथ डोके, टीलेश जाधव यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!