एसटी चालकाच्या प्रसंगावधानाने बचावले ४० प्रवासी बचावले
1 min read
बेल्हे दि.९:- अहिल्यानगर- कल्याण महामार्गाचे काम सुरू असून हे काम सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. निकृष्ट कामाच्या दर्जेमुळे वारंवार स्थानिक नागरिक आवाज उठवत आहेत. परंतु कॉन्ट्रॅक्टर कोणतेही प्रकारची दखल न घेत असल्यामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत.
बुधवार दि.८ रोजी दुपारच्या दरम्यान एसटीचा अपघात होऊन एसटीतील ४० ते ४५ प्रवासी थोडक्यात बचावले. बेल्हे जवळ गेवराई – नालासोपारा एस.टी बसचा साईट पट्ट्या न भरल्याने बस रस्त्याच्या खाली गेली. अपघात ग्रस्त बस कल्याणकडे जाणारी असून चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबविल्याने प्रवाशांचा जीव वाचला आहे.
ठेकेदाराने काम करताना साईड पट्ट्या त्वरीत न भरल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. तसेच काम चालू असलेल्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा फलक लावलेले दिसून येत नाहीत. किंबहुना बऱ्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक देखील नेमलेले नाहीत. त्यामुळे नगर कल्याण महामार्गावरील प्रवाशांच्या जीवीताशी खेळ मांडला आहे
की अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारण काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट आहे तर दुसरीकडे साइड पट्ट्या न भरल्याने एकेरी वाहतूक सुरू असून वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. लवकरात लवकर महामार्गाच्या कॉक्रीटीकरणाचे काम पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय ज्या ठिकाणी सर्विस रोड काढणे गरजेचे आहे व जोड रस्ते आवश्यक आहेत तेथे तातडीने काम हाती घेण्यात यावे. आळेफाटा ते आणे दरम्यान सुमारे एक वर्षापासून काम सुरू आहे. अतिशय संथ गतीने हे काम सुरू असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
