मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा; रॉकेट हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू, पाच जिल्ह्यांत इंटरनेट बंदीसह कर्फ्यू

1 min read

मणिपूर दि.८:- ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसा भडकली आहे. मणिपूरमधील बिष्णूपूर जिल्ह्यात मंगळवारी एका रॉकेटसारख्या वस्तूने घरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात घरात झोपेत असलेल्या चार वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या नवजात बहिणीचा मृत्यू झाला.या घटनेनंतर जिल्ह्यात हिंसाचार उसळला. दोन मुलांच्या मृत्यूनंतर अनेकठिकाणी तीव्र निदर्शने सुरू झाली. यानंतर सीआरपीएफने केलेल्या गोळीबारात दोन नागरिक ठार झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मणिपूरमधील पाच जिल्ह्यांमध्ये इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल, काकचिंग आणि बिष्णूपूर येथे तीन दिवसांसाठी इंटरनेट सेवा तात्पुरती बंद केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!