पालकांना मोठा दिलासा ! शाळा प्रवेश रद्द केल्यास आता शुल्क परत मिळणार; सरकारचे नवे धोरण

1 min read

मुंबई दि.८:- शाळेत प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या चांगल्या शाळेत संधी मिळाल्यास आता आधी भरलेले शुल्क परत मिळण्याची शक्यता वाढली आहे. राज्य सरकार लवकरच शाळा प्रवेश रद्द केल्यास शुल्क परतावा बंधनकारक करणारे नवे धोरण जाहीर करण्याच्या तयारीत आहे.राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत संकेत दिले असून,खासगी शाळांकडून होणाऱ्या पालकांच्या आर्थिक पिळवणुकीवर आता लगाम बसणार आहे.आता पालकांना होणारा फायदा प्रवेश रद्द केल्यास शुल्क परत मिळू शकते. शाळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक होईल. पालकांची आर्थिक फसवणूक कमी होईल.सर्व मंडळांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांना नियम लागू होऊ शकतात.अनेक पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एकापेक्षा जास्त शाळांमध्ये अर्ज करतात. एका शाळेत तात्पुरता प्रवेश घेतला जातो.नंतर अधिक चांगल्या शाळेत प्रवेश मिळाल्यास पहिल्या शाळेतील प्रवेश रद्द केला जातो.मात्र, भरलेले शुल्क परत मिळत नसल्याने पालकांना मोठा आर्थिक फटका बसतो. सध्या अनेक शाळांकडून “शुल्क परत करण्याचे नियम नाहीत”, “प्रक्रिया सुरू आहे” अशा कारणांवर पालकांना टाळाटाळ केली जाते. त्यामुळे पालकांना मानसिक त्रासासोबत हजारो रुपयांचे नुकसानही सहन करावे लागते.सरकार इयत्ता 1ली, 5वी, 6वी आणि 9 वीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र शुल्क परतावा धोरण आणण्याचा विचार करत आहे.पालकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा दायक बातमी ठरू शकते. आता शाळांकडून होणारी मनमानी थांबेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!