कावळ पिंपरी, पारगाव, मंगरूळ, झापवाडी येथे गारपीट
1 min read
बेल्हे दि.२:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कावळ पिंपरी, पारगाव तर्फे आळे, मंगरूळ, झापवाडी, पाडळी आळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट व पाऊस झाला. बुधवार दि.१ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ सुटले. वादळाबरोबर सुरुवातीला जोरदार गारा बरसल्या.
त्यानंतर पाऊस जोरदार सुरू झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ नुकसान झालं आहे. जुन्नरच्या पूर्व भागामध्ये तरकारी पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं असेच कांदा उत्पादन क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्याचा हात तोंडाशी आलेला घास या गारपिटीने हिसकून घेतला असून त्वरित पंचनामे करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य, पांडुरंग पवार तसेच शेतकऱ्यांनी महसूल व कृषी विभागाकडे केली आहे.
