एरोकोड कंपनीमध्ये समर्थ अभियांत्रिकी च्या ५ विद्यार्थ्यांची निवड
1 min read
बेल्हे दि.१:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एरोकोड प्रा.लि. यांच्या वतीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाअंतर्गत “ऑनलाईन कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह-२०२६” चे नुकतेच आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ नवनाथ नरवडे यांनी दिली.
या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये कंप्यूटर इंजीनियरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इंजिनिअरिंग या शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एरोकोड कंपनीचे को फाउंडर सागर मेहेर, युवराज हांडे व टेक्निकल पॅनेल चे सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर संध्या सिंग गौर,
जूनियर सॉफ्टवेअर इंजिनियर तन्मयी सोमवंशी यांनी ऑनलाईन चाचणी व मुलाखती घेतल्या. निवड प्रक्रियेत एकूण ५ विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी दिली. या विद्यार्थ्यांना ऐरोकोड कंपनी पुणे येथे ट्रेनी डेव्हलपर म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
कंप्यूटर इंजीनियरिंग:-अनुभव सिंग, साहिल आहेर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इंजिनिअरिंग:-अभिषेक कुऱ्हाडे, तन्मय कणसे, निकिता औटी. प्लेसमेंट कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कम्प्युटर इंजीनियरिंग विभाग प्रमुख प्रा.स्नेहा शेगर,
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागप्रमुख प्रा.शुभम शेळके, प्रा.निलेश नवले, प्रा.सिद्धेश गडगे यांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,
कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
