औरंगपुर मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

1 min read

औरंगपुर दि.३१:- औरंगपुर (ता.जुन्नर) मध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हभप विशाल महाराज हाडवळे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सप्ताहाच्या कालावधीमध्ये रोज पहाटे काकाडा भजन,गाथा भजन नियमाचे भजन, हरिपाठ, हरिकार्तन, महाप्रसाद, श्रीहरी जागर त्यामध्ये ७ ते ९ किर्तन ९ नंतर महाप्रसाद असा दिनक्रम होता. श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह औरंगपुर (श्रीराम नगर पटवाडी) येथे मोठ्या प्रमाणावर सर्व ग्रामस्थ व सर्व राम भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडला. यामध्ये अनुक्रमे हभप श्रीकांत महाराज दुराफे, विजय महाराज खाडे, नितीन महाराज सुक्रे, हनुमान महाराज गंगाथडे यांची सुश्राव्य अशी किर्तने झाली व हभप बजरंग महाराज आंधळे (कजृले हर्या) यांनी प्रभु श्रीरामांच्या जन्माचे व हभप विशाल महाराज हाडवळे (राजूरी जुन्नर) यांच्या काल्याच्या किर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यात पुढील वर्षी होणाऱ्या भक्ती पंढरीला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या तर काही दानशूर व्यक्तींनी आपले दातृत्व ही जाहीर केले. त्या वेळी पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, पंचायत समिती सदस्य संभाजी चव्हाण अशी अनेक मान्यवरांनी उपस्थित होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!