निमगाव सावात श्री चेडोबा देवाचा उत्सव व सप्ताहाची सांगता
1 min read
निमगाव सावा दि.३१:- श्री चेडोबा देवाचा उत्सव व श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह निमगांव सावा (ता जुन्नर) येथे प्रारंभ चैत्र शु.सोमवार दि २३ मार्च ते सोमवार दि ३० मार्च या कालावधीत संपन्न झाला. या कालावधीमध्ये दैनंदिन कार्यक्रम पाहटे. ४ ते ६ काकडा आरती,
सायंकाळी ६ ते १० पा. रामायण ग्रंथ पारायण रात्रौ ७ ते ९ हरि किर्तन, नंतर महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. निमगाव सावा गावातील शिवमळा परिसरात श्री चेडोबा देवाचा उत्सव व प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताह किर्तन सोहळ्यामध्ये आयोजन करण्यात आले होते.
या सोहळयानिमित प्रभू श्रीराम जन्माचे किर्तन ह.भ.प. दादा महाराज गुंजाळ यांची किर्तन सेवा संपन्न झाली. मोठ्या थाटामाटात कीर्तन सोहळ्याचे आयोजन चेडोबा व श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने करण्यात होते. त्यामध्ये ह भ प हंसराज महाराज मिसाळ (जालना), यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तरी परिसरतील भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित लावली व सर्व दानशूर देणगीदारांचे व अन्नदत्याचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमासाठी सुत्रसंचलन व आभार वैभव पांडुरंग गाडगे ,उत्तम नारायण गाडगे यांच्या माध्यमातून करण्यात आले.
