गोसावी समाज महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जयराज घाडगे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यात व्यापक दौरा
1 min read
आळेफाटा दि.२४:- अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघ, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष जयराज घाडगे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यात गेल्या तीन दिवसांत व्यापक दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यादरम्यान ज्या-ज्या ठिकाणी गोसावी समाज बांधव वास्तव्यास आहेत,
त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्याचे व त्या सोडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले.समाजातील अनेक प्रश्न समजून घेत त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून, यामुळे समाज बांधवांमध्ये विश्वास आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
याच अनुषंगाने जुन्नर तालुक्यात अखिल भारतीय भटके गोसावी समाज महासंघाची नवीन शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या २२ एप्रिल रोजी जुन्नर येथे भव्य गोसावी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून, या मेळाव्यात जयराज घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेचे उद्घाटन पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन संघटक शंकर घाडगे तसेच सामाजिक कार्यकर्ते गोविंद जाधव, आकाश माळी, दीपक माळी, सतीश घाडगे आदी मान्यवरांच्या सहकार्याने होणार आहे. शाखा उद्घाटन सोहळ्यात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व पदवाटप देखील करण्यात येणार आहे. ज्यामुळे संघटनात्मक बळकटी वाढण्यास मोठी मदत होईल.
तसेच जयराज घाडगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हे, तालुके आणि गावांमधून नवतरुण युवकांचा एकोपा निर्माण करण्याचे मोठे कार्य सुरू आहे. युवकांना एकत्र आणून समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणे, संघटन मजबूत करणे आणि भविष्यात सक्षम नेतृत्व तयार करणे या उद्दिष्टाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या माध्यमातून समाजात एकजूट, जागरूकता आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.भविष्यात गोसावी समाजातील सर्व अडी-अडचणी सोडवण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने काम करण्यात येणार आहे.
समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि एकात्मता या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमाच्या प्रसारासाठी जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी दौरे करून तसेच जाहिरातींद्वारे सर्व समाज बांधवां पर्यंत माहिती पोहोचविण्यात आली आहे.
या सकारात्मक आणि प्रेरणादायी उपक्रमाबद्दल जुन्नर तालुक्यातील सर्व गोसावी समाज बांधवांनी घाडगे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.समाजाच्या एकजुटीचे आणि प्रगतीचे हे पाऊल निश्चितच भविष्यात मोठा बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
