प्रमोद क्षीरसागर यांची पुणे ग्रामीणच्या LCB शाखेवर नियुक्ती

1 min read

पुणे दि.२४:- पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक
गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पदावर प्रमोद क्षीरसागर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांनी काल मध्यरात्री १२ वाजता अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे पुणे ग्रामीण भागातील गुन्हेगारीविरोधी कारवाई अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.पोलिस दलातील अनुभवी आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या प्रमोद क्षीरसागर यांनी यापूर्वी शिक्रापूर, आळेफाटा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस करण्यात आलेले असून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!