विशाल जुन्नर मध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह संपन्न
1 min read
आळे दि.२३:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च व इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आळे या महाविद्यालयांमध्ये विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष, सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली औषधनिर्माण क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या Gennova
Biopharmaceuticals Ltd, Emcure group या कंपनीचा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी Gennova biopharmaceuticals Ltd चे Hr manager निलेश खैरे व production manager संपत आवारे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.डी गायकवाड,
प्राचार्य डॉ एस एल जाधव, प्राचार्या डॉ. रूपाली हांडे आदी. मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली. महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख पाहुण्याचे सत्कार करून स्वागत करण्यात आले. प्रा. आश्लेषा चिंचवडे यांनी प्रास्ताविक व कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.
प्रमुख पाहुणे निलेश खैरे HR Manager यांनी या इंटरव्ह्यू मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीचे औषधनिर्माण क्षेत्रातील योगदान स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील मुलांमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची व कष्ट करण्याची उमेद असते असं त्यांच्या अनुभवातून त्यांनी अधोरेखित केलं.
नोकरी करत असताना विद्यार्थ्यांमध्ये कोणते गुण असावेत याविषयी देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू साठीचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. महाविद्यालयाचे एकूण ८८ विद्यार्थी या इंटरव्ह्यू साठी उपस्थित होते. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी अतिशय औपचारिकपणे इंटरव्ह्यू दिले.
महाविद्यालय ग्रामीण भागामध्ये असूनही विद्यार्थ्यांमध्ये असणारे संवाद कौशल्य,औषधनिर्माण शास्त्रातील औद्योगिक क्षेत्रातील अद्ययावत नियमावली याविषयी विद्यार्थ्यांना असणारी माहिती व विद्यार्थ्यांमध्ये असणारा शिस्तबद्धपणा, यासाठी HR मॅनेजर निलेश खैरे व संपत आवारे यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.
या इंटरव्ह्यू मध्ये एकूण ४५ विद्यार्थ्यांची Quality assurance, quality control and formulation अशा विविध विभागांमध्ये निवड झाली. डॉ. शिल्पा कोल्हे यांनी कार्यमाचे आभार प्रदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी विशेष सहकार्य केलं. महाविद्यालयाच्या वतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
