शाळांमध्ये मोबाईल बंदी! जगातील ११४ हून अधिक देशांनी उचलले बंदीचे पाऊल
1 min read
नवी दिल्ली दि.२३:- सोशल मीडियामुळे मुलांच्या एकाग्रतेत होणारी घट, सायबर बुलिंग आणि मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, जगातील ५८ टक्के देशांनी शाळांमध्ये मोबाईल फोनवर बंदी घातली आहे.
युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग पथकाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, गेल्या तीन वर्षांत या बंदीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत तब्बल ११४ देशांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.मोबाईल बंदीचा हा कल अत्यंत वेगाने विस्तारत आहे.
जून २०२३ मध्ये केवळ २४ टक्के देशांमध्ये अशी बंदी होती. २०२५ च्या सुरुवातीला हे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आणि मार्च २०२६ पर्यंत ५८ टक्के देशांनी मोबाईलला शाळा बाहेर ठेवणे पसंत केले आहे.यामध्ये बोलिव्हिया, कोस्टा रिका, क्रोएशिया, मालदीव आणि माल्टा यांसारख्या देशांचा नव्याने समावेश झाला आहे.
तर फ्रान्ससारख्या देशात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये आधीच कडक नियम लागू करण्यात आले आहे. आता तिथे अधिक स्पष्ट कायदे बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
