मळगंगा देवी आणि कानिफनाथ बाबा यात्रोत्सवात रंगला कुस्त्यांचा आखाडा
1 min read
बेल्हे दि.२३:- सालाबादप्रमाणे याही वर्षी गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथे मळगंगा देवी आणि कानिफनाथ बाबा यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी मळगंगा देवी आणि कानिफनाथ बाबाची आरती, पूजा, अभिषेक आणि मांडव डहाळ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
दिवसभर मळगंगा मातेच्या प्रांगणात शेरनी वाटप करण्यात येत होते.रात्री आठ ते दहा या वेळेत शोभेची आतिषबाजी तसेच देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. तसेच पारंपारिक पद्धतीने लेझिम खेळाचे नियोजन करण्यात आले होते.
रात्री मनोरंजनासाठी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळ यांचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी चार ते सात वाजेपर्यंत कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला होता. या आखड्यात पन्नास रुपयांपासून ते पाच हजार रुपये पर्यंत कुस्त्या खेळण्यात आल्या.
नामवंत पहिलवान तसेच महिला कुस्तीपटूनी देखील या आखड्यात सहभाग घेतला होता. विजेत्या पहिलवानांना तुकाराम गुंजाळ यांच्या हस्ते रोख रक्कम बक्षीस वितरण करण्यात आले.आखाड्याला उद्योजक पंकज कणसे, गावचे सरपंच अतुल भांबेरे, उपसरपंच शांताराम गुंजाळ,
भाऊसाहेब भांबेरे, काशिनाथ गुंजाळ, विठ्ठल गुंजाळ, शांताराम गुंजाळ, जालिंदर देवकर, बाळासाहेब देवकर, नामदेव आग्रे, विजय गुंजाळ, अनिल गुंजाळ, बाबाजी भांबेरे, संतोष भांबेरे यांची उपस्थिती होती.
