जुन्नर,आंबेगाव, खेड तालुक्यात विद्युत रोहीत्र चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद
1 min read
जुन्नर दि.२३:- विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद करून २३ गुन्हे उघडकीस आले असून १३७ किलो ग्रॅम वजनाच्या तांब्याच्या पट्टया व तारांसह गुन्हयात वापरलेली वाहने जप्त करून एकूण रू. ८,९२,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणची कारवाई करण्यात आली. पुणे ग्रामीण जिल्हयात विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे प्रमाण वाढले होते,त्याअनुषंगाने गुन्हे दाखल करणेत आले आहेत. विद्युत रोहीत्र चोरी गेल्याने परीसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असे, तसेच परीसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या.
विद्युत रोहीत्र हे दुर्गम भागात असल्याने चोरी झालेनंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसीटीव्ही याद्वारे तपास होणे अडचणीचे होते. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्था.गु.शा.चे पो.नि. अविनाश शिळीमकर व पथकाची बैठक घेवून सन २०२५ व सन २०२६ मधील दाखल गुन्हांचा आढावा घेवून
गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मागदर्शन करून सुचना केल्या. त्या अनुषंगाने जुन्नर-खेड उपविभागात कामकाज पाहणारे अधिकारी अंमलदार यांचे पथकास नियुक्त करणेत आले. गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती वाचा आढावा घेण्यात आला.
तपास पथकाने गुन्हयांची घटनास्थळे पडताळून घटनास्थळा कडे येणारे जाणारे रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत करून तपास चालू केला. सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले
असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची दोन तपास पथके रवाना करणेत आली. विद्युत रोहीत्र चोरणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परीसरात असले बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकांनी सापळा रचून आरोपी नामे
१) भास्कर रंगनाथ केवळ वय ३४ वर्षे रा. पिराचीवाडी निमदरी ता जुन्नर जि पुणे २) कृष्णा बबन जाधव वय ३० वर्षे रा. मिडगुलवाडी कान्हूर मेसाई ता. शिरूर जि पुणे, ३) दिपक लहू भालेकर वव ३० वर्षे रा. डगाडवाडी, येणेरे ता. जुन्नर जि पुर्ण, ४) सुखरूप सुखदेव नांगरे वय २४ वर्षे रा. हिवरे तर्फे नारायणगाव ता. जुन्नर जि पुणे,
५) राजेंद्र भालचंद्र भालेकर वय ३३ वर्षे रा. ढगाडवाडी येणेरे ता. जुन्नर जि पुणे यांना दि. १७/०३/२०२६ रोजी मांजरवाडी रोड, पुणे-नाशिक बायपास जवळ परिसरातून सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.त्यांचे कडे चौकशी केली असता, त्यांनी पुणे जिल्हयातील विविध ठिकाणी विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले असून
तपासा दरम्यान गुन्हा करणेसाठी वापरलेली इरटीगा कार, अल्टो कार अशी दोन चारचाकी वाहने, चोरी केलेल्या १३७ कि.ग्रॅ. वजनाच्या तांब्याच्या तारा/प्लेटा असा एकूण ८,९२,०००/- रू. कि.चा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. चौकशीमध्ये त्यांचेकडून खालील २३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर अहिल्यानगर, पुणे ग्रामीण जिल्हयात यापुर्वी विद्युत रोहीत्र चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर उपविभाग,
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, खेड उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, पोलीस अंमलदार, दिपक साबळे, संदिप वारे, अक्षय नवले, विक्रमसिंह तापकीर, हेमंत विरोळे,
निलेश सुपेकर, राजु मोमीण, महिला पोलीस हवालदार सुजाता कदम, यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहेत.
