मी कृष्णाचा अवतार, तू मागच्या जन्मातील माझी राधा’; डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन, पेढा अन् पाणी प्यायला द्यायचा; भोंदूबाबा अशोक खरातची काळी कृत्य उघड

1 min read

नाशिक दि.२१:- महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेला नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे कारनामे समोर येऊ लागले आहेत. पीडित महिलेशी ओळख ते अनेक वर्षे अत्याचार अशी कॅप्टन खरातची क्रूर कहाणी समोर आली आहे. विशेष पोलीस पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात पोलीस कॅप्टन फाईल्सचा कसून तपास करीत आहेत. दरम्यान पीडितेने आपल्यावर ओढावलेली आपबीती तक्रारीतून पोलीसांना सांगितली आहे.अशोक खरात याला अटक केल्यानंतर तपासादरम्यान पोलीसांनी काही व्हिडिओ देखील जप्त केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे, या प्रकरणी अनेक व्हिडीओ, फोटो आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.अशातच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न देखील समोर आला आहे. महिलेने दाखल केलेल्या एफआयआर मधून धक्का दायक खुलासे समोर आले आहेत. महिलेने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, २०१९ साली कॅनडा कॉर्नर येथे पीडितेशी अशोक खरात याची ओळख झाली. माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून अशोक खरात याने महिलेचा विश्वास संपादन केला. महिलांच्या दैनंदिन आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी अशोक खरात विविध विधी करीत असे. अशोक खरात याच्याशी ओळख झाल्यानंतर आणि चांगली मैत्री झाल्यानंतर २०२१ मध्ये पीडितेचा साखरपुडा मोडला. महिलेकडून ५० हजार उकळत तिला पुष्कराज खडा दिला. नोव्हेंबर २०२३ मध्ये खरातने पीडितेला कार्यालयात बोलावलं. प्रसाद म्हणून पेढे आणि पाणी दिल्याने तिला गुंगी आली. भीती दाखवत कॅप्टन खरातने महिलेवर अत्याचार केला.पीडितेचे लग्न झाल्यानंतर कॅप्टन खरातने पुन्हा पीडितेवर अत्याचार केला. मी कृष्णाचा अवतार आहे.तू माझी मागच्या जन्मीची राधा आहेस, अशी बतावणी कॅप्टन खरातने पीडितेला केली.तू माझी प्रेयसी न झाल्यास तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल, अशी भीतीही त्याने महिलेला घातली. त्यानंतर मात्र पीडितेने नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या कृत्याचा भांडाफोड झाला. मी कृष्णाचा अवतार आहे. तू मागच्या जन्मातील माझी राधा आहे, असे सांगून महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन कॅप्टन खरात त्यांच्या कानाजवळ पुटपुटायचा. त्यापूर्वी पेढा आणि कडवट -खारट चव असलेले पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्री म्हणायला लावायचा आणि लागलीच त्यांना अंगाला स्पर्श करायला सुरुवात करायचा. महत्त्वाचे म्हणजे महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली त्याच्या दालनाबाहेर बसवून ठेवायचा, असे एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!