ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बीड येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
1 min read
बीड दि.२१:- ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बीड येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न दि. 20 मार्च 2026 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.ही बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
बैठकीत गाळप हंगाम 2025-26, शेतकऱ्यांना देय असलेली एफ.आर.पी. रक्कम, तसेच काही कारखान्यांचे गाळप बंद झाल्यानंतरही थकीत देयके याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.यावेळी संबंधित साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांची थकीत रक्कम त्वरित अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच, नियमांनुसार ऊस खरेदी व देयक प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याबाबतही स्पष्ट निर्देश देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या हितास सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन सजग असून, त्यांच्या प्रश्नांबाबत आवश्यक ती कार्यवाही तत्परतेने करण्यात येत आहे.
