नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण, नीरज जाधव हा खरा मास्टर माइंड
1 min read
नाशिक दि.२१:- नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे, तर या घटनेत नीरज जाधव हा या प्रकरणाचा खरा मास्टर माइंड आहे. भोंदू अशोक खरातचे 58 व्हिडीओ समोर आणणारा खरा मास्टर माईंड नीरज जाधव आहे. अशोक खरातचे 58 व्हिडीओ समोर कसे आले?
हा प्रश्न निर्माण झाला होता. आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या ज्योतिषी अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेनंतर त्याचे राजकीय लोकांशी कनेक्शन उघडकीस आले आहे.
नाशिकच्या या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. स्वतःकडे देवी शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातचे धक्कादायक अश्लील व्हिडीओ ही समोर आले आहेत.नीरज जाधव हा या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याची माहिती मिळाली आहे.
भोंदूबाबा अशोक खरातच्या मर्जीतील ऑफिस बॉय नीरज जाधव याच्यामूळे हे प्रकरण समोर आले आहे, अशी माहिती उघडकीस आली आहे.नीरज जाधव हा या भोंदूबाबा प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. डिसेंबर 2025 मध्ये नीरज जाधवनेच भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यालयातून 58 महिलांवरील बलात्काराचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.
नीरज जाधव हा भोंदू बाबा अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या करारनाम्याचा संशय आला होता. दुष्कृत्य करूनही भोंदूबाबा अशोक खरात समाजात साधू म्हणून वावरत आहे. हे पाहून नीरज जाधवने भोंदूबाबा अशोक खरातकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
नीरज जाधवने भोंदूबाबा अशोक खरातला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. नीरज जाधव आणि त्याच्या काही साथीदारांनी या महिलांच्या वादग्रस्त 58 अश्लील क्लिप्सच्या बदल्यात भोंदूबाबा अशोक खरातकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचीही माहिती मिळाली आहे.
परंतु भोंदूबाबा अशोक खरातने नीरज जाधवच्या धमक्यांना भाव दिला नाही.तुला काय करायचे ते कर असे त्याने नीरज जाधवला उत्तर दिले होते. त्यानंतर नीरज जाधवने पीडित महिलांची मदत घेण्याचा प्रयत्न केला.नीरज जाधवने शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिलाच व्हॉटसअॅपवर पाठवून धमकावले होते.
या महिलेचे आणि भोंदू बाबा अशोक खरातचे बोलणे झाले. नीरज जाधव सतत धमकी देत असल्याचे पीडिते महिलेने भोंदू बाबा अशोक खरातला सांगितले. परंतु, भोंदू बाबा अशोक खरातने स्वतःला वाचविण्यासाठी तिला पोलिसात जाण्याचा मार्ग सुचवला.
भोंदू बाबा अशोक खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता नसल्यामुळे नीरज जाधवने नाशिक शहरातील सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला आणि भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण वाढले आहे. मेहुण्याने या प्रकरणाकडे गांभिर्याने घेतले आणि पीडित महिलेला धीर देण्याचा प्रयत्न केला.
आणि पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. पीडित महिलेने मेहुण्याचे म्हणणे ऐकले आणि पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आले आहे.या प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरात विरुद्ध नाशिक मधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यांनंतर 18 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या वेळी भोंदूबाबा अशोक खरातला अटक करण्यात आली, आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात अधिक तपास नाशिक पोलिस करत आहेत.
