आळेफाटा येथील श्रीशा आहेर हिची जवाहर नवोदय विद्यालयसाठी निवड
1 min read
आळेफाटा दि.१९:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळेफाटा या शाळेतील जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेत श्रीशा संभाजी आहेर हिने 95 टक्के गुण मिळवून तिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी सार्थ निवड झाली आहे.गटशिक्षणाधिकारी अशोकजी लांडे शिक्षण वि. अधिकारी विष्णू धोंडगे व वि. अधिकारी गोडसे, केंद्रप्रमुख अनिता कुऱ्हाडे,
शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ चव्हाण तिला शिकवणाऱ्या मार्गदर्शक शिक्षिका शीला गणेश ढमाले व रेश्मा विकास आभाळे व साधना संभाजी आहेर व सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर देवकर उपाध्यक्ष शीतल पवळे, सर्व सदस्य सोमनाथ गडगे,
गणेश गडगे, संदीप गडगे, अमीर चौगुले, हरीश सासवडे, कल्पना सोनवणे मोनिका गडगे व ग्रामस्थ पालक यांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण यांनी दिली.
