नाशिकमधील भोंदूबाबा स्वयंघोषित कँप्टन अशोक खरातला अटक; पोलीसांकडून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त
1 min read
नाशिक दि.१९:- बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका स्वयंघोषित कॅप्टन आणि ज्योतिषाला अटक केली आहे. अशोक खरात असं या ज्योतिषाचे नाव आहे. नाशिक पोलिसाच्या क्राइम ब्रांच-१ युनिटने बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिकसह राज्यात खळबळ उडाली आहे.
एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात या अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अटकेमुळे नाशिकमधील भोंदूगिरी आणि शोषणाचे एक मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ ‘स्वघोषित कॅप्टन’ला अटक करण्यात आली. नाशिकच्या क्राइम ब्रांचने ही मोठी कारवाई केली.अशोक खरातविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल ५८ व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसां कडून जप्त करण्यात आलेल्या व्हिडिओंची सखोल तपासणी सुरू असून त्यामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास नाशिक क्राइम ब्रांच करत आहे.
अशोक खरातवर ३५ वर्षांच्या महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे.याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे. या तपासादरम्यान पोलीसांच्या हाती अत्यंत संवेदनशील पुरावे लागले आहेत.
संशयित खरात याच्याकडून तब्बल ५८ आक्षेपार्ह चित्रफिती (व्हिडिओ) जप्त करण्यात आल्या असून या चित्रफितींचा वापर संबंधितांना ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा दबावाखाली ठेवण्यासाठी केला जात होता का? या दिशेने आता गुन्हे शाखेचा सखोल तपास सुरू आहे.
जप्त करण्यात आलेल्या तांत्रिक पुराव्यांच्या छाननीतून या रॅकेटमधील अनेक बड्या धेंडांचे चेहरे समोर येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आक्रमक भूमिका घेतली आहे.
“भोंदूगिरीच्या जोरावर महिलांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांना जाळ्यात ओढणाऱ्या या विकृत प्रवृत्तीची केवळ बलात्काराच्या गुन्ह्याखालीच नव्हे, तर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गतही सखोल चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी समितीने केली आहे.
